निर्मला सीतारामन आणि अजितदादा आज बारामतीत समोरा-समोर !

 

बारामती काबीज करण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहे. तर आज राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते अजित पवार सुद्धा बारामतीत पोहोचले आहे. त्यामुळे अजित पवार आणि निर्मला सीतारामन आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आजपासून तीन दिवस बारामती दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली. सकाळी साडेआठ वाजता विद्या प्रतिष्ठान येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असून याच ठिकाणी ते जनता दरबार देखील घेणार आहेत तर दिवसभरात विविध विकास कामांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारा मन यांचा देखील बारामती लोकसभा दौऱ्यावर असून पवार आज काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निर्मला सितारामन या बारामती लोकसभेच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी इंदापुरात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन शेतकऱ्यांना संबोधित केले.यावेळी त्यांनी जे शेतकऱ्यांनी प्रश मांडलेत ते मी केंद्रीय कृषी मंत्रांच्या कानी घालणार आहे, असं आश्वासन दिलं.

तसंच स्टीलवर सरकारने टॅक्स टाकला, त्याच कारण होत की लघु उद्योग करताना त्यांना स्टील लागते..परंतु त्यांना स्टील उत्पादकाना स्टील निर्यात केल्यावर जास्त किंमत मिळते. लघु उद्योगांना तेवढ्या किंमतीत स्टील घेणं परवडत नव्हते. म्हणून स्टील निर्यात करण्यासाठी टॅक्स लावला. विदेशात शेतीचा माल निर्यात करण्यासाठी टॅक्स लावला जातो तो कसा बंद करता येईल त्यावर निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलंय.

 

Team Global News Marathi: