नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी नवी नियमावली
नाताळ आणि नवीन वर्षाच्या पाश्वभूमीवर शिर्डी संस्थान येथे दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिर्डी संस्थानने नवी नियमावली जाहीर केली आहे, गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाही.
तसेच दर्शनासाठी भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.
तसेच ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे. दररोज १२ हजार भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचे म्हटले आहे.