नवा उच्चांक ! राज्यात आज 63,729 नवे रुग्ण; 398 मृत्यू
45 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
ग्लोबल न्यूज – राज्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी उच्चांकी कोरोना आकडेवारी समोर आली आहे. आज राज्यात 63 हजार 729 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 30 लाख 04 हजार 391 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 लाख 03 हजार 584 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 45 हजार 335 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 टक्के एवढं झाले आहे.
राज्यात आज 61,695 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 53335 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2959056 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 620060 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.3% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 15, 2021
राज्यात आज 398 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 59 हजार 551 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.61 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 168 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 08 हजार 878 नमूने तपासण्यात आले आहेत.
पुण्यात सध्या सर्वाधिक 1 लाख 16 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 84 हजार 378, ठाण्यात 84 हजार 038, नागपूर मध्ये 71 हजार 539 तर, नाशिक जिल्ह्यात 49 हजार 925 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे, मुंबई, ठाण्यातील स्थिती भीषण
राज्यात सध्या करोनाचे ६ लाख ३८ हजार ३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. मुंबई पालिका क्षेत्रात ८४ हजार ३७८, ठाणे जिल्ह्यात ८४ हजार ३८, नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५३९, नाशिक जिल्ह्यात ४९ हजार ९२५ अशी सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. राज्यातील अन्य प्रमुख शहरांतही करोनाची स्थिती भीषण बनली आहे. मुंबई पालिका क्षेत्रात आज ८ हजार ८०३ नवीन रुग्णांची भर पडली तर पुणे पालिका क्षेत्रात ५ हजार ४३७ नवीन रुग्ण आढळले.