मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार समोर आल्याने आता जगभरात त्यामुळे दहशत पसरण्यास सुरुवात झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये तब्बल 1,407 अंकांची घसरण झाली आहे. तसेच ३० शेअर असणाऱ्या बीएसईचा निर्देशांक १,४०६.७३ अंकांनी म्हणजेच तब्बल ३ टक्क्यांनी घसरुन ४५,५५३.९६ अंकांवर बंद झाला आहे. तर एनएसई निफ्टी ४३२.१५ अंकांनी म्हणजेच ३.१४ अंकांनी घसरून १३,३२८.४० वर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जोरदार घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं तब्बल ७ लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
सोमवारी दुपारनंतरील व्यवहारादरम्यान स्थानिक शेअर बाजारात खळबळ उडाली. जोरदार विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स २००० हून अधिक अंकांनी खाली आला होता. त्यामुळे सेन्सेक्स जवळजवळ ४५ हजारांच्या देखील खाली आला होता आणि निफ्टीमध्येही ६०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली होती. युरोपियन शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारावरही त्याचा जबरदस्त परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ३० शेअरांवरील प्रमुख सेन्सेक्स मागील सत्रच्या तुलनेत २८.५१ अंकांच्या घसरणीसह ४६,९३२.१८ अंकांवर सुरु झाला होता आणि ४४,९३२.०८ टक्क्यांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या 50 शेअरचा प्रमुख समभाग असलेला निफ्टीही १३,७४१.९० वर सुरु झाला होता आणि मागील सत्रांच्या तुलनेत १८.६५ अंकांच्या घसरणीसह १३,१३१.४५ अंकांपर्यंत त्याची घसरणा झाली.
यूनाइटेड किंगडम से आने वाली सभी अंतरराष्ट्रीय उड़ानों के यात्रियों को 22 दिसंबर के 23:59 बजे तक RT-PCR जांच कराना अनिवार्य है: केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री हरदीप सिंह https://t.co/4bmlxbRV05
— ANI_HindiNews (@AHindinews) December 21, 2020
इंग्लंड-भारत विमान वाहतूक ३१ डिसेंबरपर्यंत बंद
इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा घातक अवतार, जगाच्या चिंतेत वाढ
गेल्या २४ तासात सापडले २४ हजाराहून अधिक नवे रुग्ण
कोरोनाच्या नव्या व्हायरसमध्ये पुन्हा एकदा जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारामध्ये विक्रीचा जोर वाढला.