बिहारमध्ये एनडीएच ठरली भारी; नितीशकुमार-मोदी सरकारला स्पष्ट बहुमत

पाटणा : बिहार  विधानसभेच्या निवडणुकीत  एनडीएला  बहुमत मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या.

बिहारमध्ये नितीश सरकार, एनडीएला बहुमत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए निवडणूक लढवेल, असे जाहीर केले होते. निवडणुकीत एनडीएचा विजय झाला तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असेही अमित शहा म्हणाले होते.

विधानसभा निवडणुकीत एनडीएला २४३ पैकी १२५ जागांवर विजय मिळाला. भाजप ७४, जेडीयू ४३, हम आणि व्हीआयपी प्रत्येकी ४ जागांवर विजयी झाले. बिहार विधानसभेसाठी एनडीए म्हणून निवडणूक लढवताना जेडीयू  ११५, भाजप  १११, विकासशील इन्सान पार्टी  ११ आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा  ७ जागांवर निवडणूक लढले होते.

एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष भाजप झाला. राष्ट्रीय जनता दल बिहारमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. आरजेडी ७५ जागांवर विजयी झाली. पण महागठबंधनला बहुमताचा आकडा गाठणे जमले नाही.

महागठबंधन ११० जागांवर विजयी, आरजेडी ७५ जागांवर विजयी

महागठबंधन ११० जागांवर विजयी झाले. आरजेडी ७५, काँग्रेस १९, सीपीआय माले १२, सीपीएम २, सीपीआय २ जागांवर विजयी झाले. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल  हा पक्ष सर्वाधिक १४४ जागांवर निवडणूक लढवत होता. काँग्रेस  ७० जागांवर सीपीएम  चार जागांवर तर तर सीपीआय  सहा जागांवर आणि सीपीआय माले  १९ जागांवर निवडणूक लढले होते.

एनडीएमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान  यांच्या लोक जनशक्ती पार्टीला  फक्त एक जागा जिंकता आली. राज्यात सात जागा इतर जिंकले.

बिहार विधानसभा निवडणूक २०२० – पक्षनिहाय निकाल

एनडीए  – १२५ जागांवर विजय
भाजप  – ७४
जेडीयू  – ४३
विकासशील इन्सान पार्टी – ४
हिंदुस्तानी अवाम मोर्चा  – ४

महागठबंधन – ११० जागांवर विजय
राष्ट्रीय जनता दल  – ७५
काँग्रेस  – १९
सीपीआय माले  – १२
सीपीआय  – २
सीपीएम – २

लोक जनशक्ती पार्टी  – १ जागेवर विजय

इतर – ७ जागांवर विजय

बहुमताचा जादुई आकडा – १२२ जागा

बिहार विधानसभा एकूण जागा – २४३

ग्लोबल न्युज नेटवर्क: