एनडीएच्या बैठकीला शिंदे गटाला थेट मोदी सरकारचे दिल्लीतून निमंत्रण

 

नवी दिल्ली | शिवसेनेमध्ये बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले आहे. आता शिंदे गट आणि भाजपमध्ये संबंध घनिष्ठ होत चालले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाला भाजपने बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. शिंदे गटाकडून दीपक केसरकर हे दिल्लीच्या बैठकीला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. येत्या १८ जुलैला राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. एनडीएकडून द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने एनडीएनच्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आलं आहे. राष्ट्रपतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात NDA ने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिंदे गट सहभागी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आमदार दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. हा शिवसेना पक्षासाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे शिवसेना ही एनडीएतून बाहेर पडली होती. आता शिंदे गट वेगळा स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एनडीएकडून शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेनेचा एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

Team Global News Marathi: