राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजन पाटलांची आगळी-वेगळी पक्ष निष्ठा..असे आपवादानेच दिसते..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजन पाटलांची आगळी-वेगळी पक्ष निष्ठा..असे आपवादानेच दिसते..

ग्लोबल न्यूज: राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून सत्ता असतानाचे चेहरे आणि सत्ता नसतानाचे चेहरे बदलतांना जाणवले. ज्या राज्यातील नेत्यांना राष्ट्रवादीचे संस्थापक आणि आधारवड शरदचंद्र पवार यांनी कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध संस्था इत्यादी काढण्यासाठी त्याचबरोबर इतरही महत्त्वाचे लोकहिताचे प्रकल्प उभे करण्यासाठी मदत केली. केवळ पवार साहेबांच्यामुळे त्या टप्प्यापर्यंत जाऊ शकलेले हे नेते नंतर हे मी स्वतः साकार केले असे म्हणू लागले.. त्यांना साहेबांचा आणि पक्षाच्या घडयाळ चिन्हाचाही विसर पडला.

काळाच्या ओघात ते सर्व नेते नंतर आपआपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करून रममाण झाले. ज्या पक्षाने अन नेत्यांनी मदत केली. त्या पक्षालाही काळाच्या ओघात ते विसरले. मात्र या सर्वांना राजन पाटील अपवाद ठरले आहेत. आजही राजन पाटील हे निरपेक्ष भावनेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादीसोबतच आहेत. इथवर राष्ट्रवादी पक्षामुळेच आलो, सध्याही पक्षामुळेच आहे आणि भविष्यातही पक्षामुळेच असेल त्यांनी कायम ठेवलेली भूमिका निश्चितपणे राजन पाटलांची एक वेगळी निष्ठा अधोरेखित होत आहे.

मोहोळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यात त्याचबरोबर अगदी लोकनेते साखर कारखान्याच्या मशीनरीवर, मुख्य प्रवेशद्वार व वजन काटा इमारतीवर राष्ट्रवादी पक्षाचा लोगो मोठ्या दिमाखात झळकताना दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात असे कुठेही दिसून येत नाही.लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन हे राजन पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील हे आहेत. तर त्यांचा दुसरा मुलगा अजिंक्यराणा पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. पाटील परिवार हा शरद पवार आणि पक्षावर अढळ निष्ठा ठेवून आहे.

मोहोळ मतदारसंघात हेच झळकणारे घड्याळ राजन पाटलांच्या आगळ्या वेगळ्या संयमी निष्ठेचे निश्चितच प्रतीक म्हणावं लागेल. सद्या निष्ठेने झळकणार्‍या या घड्याळाचीच चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत आहे, हे मात्र नक्की.

ग्लोबल न्युज नेटवर्क: