नवनीत राणांचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज, “तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, मी मातोश्रीवर येते”

 

राज्यामध्ये हनुमान चालीसा व भोंगा यावरून मोठा वाद सुरू असताना या वादामध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचणार, असा इशाराचा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिला होता.

तर दुसरीकडे राणा आमदार आणि खासदार दाम्पत्याच्या या इशाऱ्यानंतर शनिवारी सकाळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांना राणा दाम्पत्याला तुम्ही मातोश्रीवर येऊनच दाखवा, असे आव्हान दिले होते. त्याला आता त्यांनी प्रत्युत्तर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार राणा म्हणाल्या की, शिवसैनिकांनी मला तारीख आणि वेळ सांगावी. त्यादिवशी मी ‘मातोश्री’वर येईल आणि हनुमान चालिसाचं पठण करेन, या शब्दात त्यांनी शिवसेनेविरोधात दंड थोपटले आहेत. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. त्यामुळे या दोघांची ताकद माझ्या पाठिशी आहे. याशिवाय, संकटमोचक हनुमानही माझ्या पाठिशी आहे, असेही नवनीत राणा यांनी म्हटले, या शब्दात त्यांनी शिवसैनिकांनी दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे.

Team Global News Marathi: