नवलानी प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर सोमय्यांचा राऊतांना टोला

 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामध्ये पेटलेल्या आरोप युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांनी बरखास्त केली आहे. हायकोर्टाने तसे आदेश दिले आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाली, असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. पण आता संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलिसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.

याा निर्णयामुळे किरीट सोमय्यांना मोठा दिलासा मानला जात आहे. जितेंद्र नवलानी प्रकरणामुळे किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा अडचणीत सापडले होते. पण आता नवलानी प्रकरण बरखास्त केल्यामुळे सोमय्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. किरीट सोमय्यांनी ट्वीट करून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा आणखी आरोप हा खोटा ठरला आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांनाही पत्र लिहिले होते. पण, आता हे आरोप सगळे खोटे ठरले आहे, असा टोला सोमय्यांनी राऊतांना लगावला. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत सोमय्या प्रकरणी तोंडघशी पडले असून काही दिवसांपूर्वी या प्रकरणात शिवसेनाभवन येथे पत्रकार परिषेद घेऊन थेट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप लागलेला होते

Team Global News Marathi: