नवाब मलिक प्रकरणी नाशिकच्या भंगारवाल्याची चौकशी सुरु

 

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचनालया अर्थतर ईडीने थेट नाशिकमध्ये धडक मारल्याची माहिती समोर येत असून नाशिकच्या अंबड परिसरातील काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू आहे. तथापि, या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने मौन बाळगणे पसंत केले आहे.

अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केलीय. नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीकडून सुरू होती. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी झाली आहे. या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहेत. याप्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आलीय. मलिक यांचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या नाशिकमध्ये व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांची ईडीने चौकशी केल्याचे समजते.

समोर आलेल्या माहितीनुसारनाशिकच्या अंबड परिसरात भंगार व्यापार्‍यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने अचानक धडक देत अनेक व्यापार्‍यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यापार्‍यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे समजते. याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे वृत्त नाही.

Team Global News Marathi: