राष्ट्रवादी नेते कारवायांना घाबरणार नाहीत; मलिक यांची विरोधकांवर टीका

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. तब्बल ३ तासांच्या चौकशीनंतर ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली आहे. तर आयकर विभागाने अजित पवारांशी निगडीत ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास १ हजार कोटींची ही संपत्ती आहे आता याच कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

मलिक म्हणाले की, राजकीय सूडबुद्धीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली. परमबीर सिंग यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून शहरात वसुलीचं रॅकेट चालवलं. जेव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हा परमबीर सिंग यांची बदली तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी १०० कोटींचा कथित वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, मात्र आज ज्यांनी हा आरोप देशमुखांवर लावला तोच फरारी आहे. ते बेल्जियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. लुकआऊट नोटीस असताना ते बाहेर कसे गेले? परमबीर सिंग यांना संरक्षण कुणी दिले? रस्ते, समुद्री आणि हवाई मार्गाने ते पळून गेले असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे असा आरोप त्यांनी केला.

Team Global News Marathi: