राष्ट्रवादीचा पलटवार | रस्ते घोटाळ्याप्रकरणी पाटलांविरोधात मुश्रीफ एफआयआर दाखल करणार

 

कोल्हापूर | भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते मात्र मुश्रीफ यांनी पत्रकार परिषेद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावत सोमय्यावर १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे विधान त्यांनी केले होते.
.
तसेच भजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे विधान त्यांनी केले होते त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले दिसून येणार आहे. मय्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्यावर आरोप केल्याचा दावा करतानाच रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं होत.

चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे. राज्यातील ९० टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे, असं सांगतानाच समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू, असं सूचक विधान करत घाडगे यांना सुद्धा इशारा दिला आहे.

Team Global News Marathi: