नारायण राणेंना दिशा सालियन बाबत केलेल्या विधानासंदर्भात चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस

 

मुंबई | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आता आता पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे . सुशांत सिंह यांचे मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे भाजपचे आमदार नितेश राणे यांना मालवणी पोलिस स्टेशनने चौकशीसाठी हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांना ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस मालवणी पोलिसांनी बजावली आहे. तर नितेश राणे यांना ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवणी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजावली आहे.

दिशा सालीयान यांच्या आई वसंती सालियन यांच्या तक्रारीवरून मालवणी पेलिसांनी या दोन्ही नोटीस नारायण राणे आणि नितेश राणे यांना बजावल्या आहेत. दिशा सालियन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यू संदर्भात ती आत्महत्या नसून खून झाल्याचं तसेच तिच्यासोबत बलात्कार झाल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पत्रकार परीषदेत जाहीररित्या सांगितलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दिशा सालियन यांच्या पालकांनी आधी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Team Global News Marathi: