नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे ? कोणाचे काम अधिक समाधानी, जनतेने दिला कौल

नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे ? कोणाचे काम अधिक समाधानी, जनतेने दिला कौल

कोरोना काळात केंद्र सरकार आणि विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या उपाय योजनांबद्दल देशातील जनता कोणाच्या कामगिरीवर समाधानी आहे. हे जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून जनतेचा कल समोर आलेला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामगिरीवर जनतेने केलेल्या मूल्यमापनावरून आश्चर्यकारक माहिती समोर आलेली आहे.

9

ABP न्युज आणि सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर राज्यातील एकूण ५८ टक्के जनता समाधानी दिसून आली आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामगिरीवर ४७ टक्के जनता समाधानी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

दरम्यान देशात कोरोना काळात चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहे. तर मुख्यमंत्री नवीन पटनायक हे पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र या टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्यांचा समावेश नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: