अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावे, राणे यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातील ठाकरे सरकार जावे अशी इच्छा माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी बोलून दाखविले आहे. सिंधुदुर्ग येथील लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे. याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती.

पुढे ते म्हणता महणाले की, शिवसेनेशी टक्कर देण्यासाठी भाजपा समर्थ आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील गुजराती समाज हा मोदी आणि शाह यांच्याव्यतिरिक्त बिनबुडाच्या लोकांकडे जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सेनेवर निशाणा साधला साधला.

पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमतीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलचे दर अमित शाह, नरेंद्र मोदी ठरवत नाहीत. त्यामुळे यासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही. शिवसेनेची धरसोड वृत्ती असल्याचे सांगत उद्धव ठाकरे सरकार व्यवस्थित चालवतात का? असा सवालही त्यांनी केला.

Team Global News Marathi: