नाणार प्रकल्प मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी लगावला सेनेला टोला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध मागे घेऊन या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना पत्र लिहिले होते.याच मुद्द्यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी बोलताना राज ठाकरे यांच्या भूमिकेचे तोंडभरून कौतुक केले आहे. तसंच, शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.

फडणवीस म्हणाले की, अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज यांनी ही भूमिका घेतली आहे. कोकणच्या विकासासाठी नाणार प्रकल्प महत्त्वाचा आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. गुजरातमधील ग्रीन रिफायनरीच्या परिसरात सर्वोत्तम आंबे होतात. फळबागा होतात. त्यामुळे प्रदूषणाबद्दलच्या शंका चुकीच्या आहेत.

मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. आर्थिक व्यवहार वाढणार आहेत. हजारो लोकांना थेट आणि लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतली ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे,’ असं फडणवीस म्हणाले.

Team Global News Marathi: