पोटावरती पसरणारा व खाजणारा एक त्वचारोग नागवेढा

शरीराला पूर्ण गोल वेढा घालणारा व त्रासदायक असा एक त्वचा विकार तो म्हणजे ‘नागिन येणं ‘म्हणजेच आपण त्याला “नागवेडा” असे म्हणतो .या त्वचारोगाबद्दल सांगायचं म्हटलं तर नागवेडा झाल्यास शरीरावर पुरळ निर्माण होते. म्हणजेच लहान स्वरूपात बारीक बारीक लालसर असा फोडांचा बारीक दातूर येतो व हा दातुर खूप खाजतो .तसेच शरीराला जलन देखील होते. हा फोडांचा घेर पूर्ण पोटाला विडा घालतो .म्हणून कदाचित याला नागवेडा असे म्हणतात .कांजण्या चा वायरस” व्हेरी सेला जोस्टर” या वायरस मुळे हा त्वचा विकार होतो .नागवेडा हा एक संसर्गजन्य त्वचा विकार आहे .त्यामुळे त्वचा विकार होऊ नये यासाठी काळजी घेणं देखील गरजेचं आहे.

नाग वेडा झाला आहे हे कसं ओळखायचं?

नाग वेडा झाल्यास शरीरावरती लालसर असे पुरळ तयार होऊन पोटाला वेढा निर्माण होतो .हे पुरळ बारीक फोडांच्या स्वरूपात असते. काही काळानंतर ते पाणी धरतात तसेच खाज देखील निर्माण होते .शरीराचे तापमान वाढते ,तोंड येते .नाग वेडा कमी होताना हे पुरळ खपल्या धरतात व फोडही जातात.

नाग वेडा हा त्वचा विकार झाल्यास जलन कमी होण्यासाठी व आराम मिळण्यासाठी हे उपाय करायला हवेत…

नाग वेडा झाल्यास प्रथमता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा .तसेच आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. जसे की लाजाळूच्या पानांचा रस लावू शकतो. लाजाळूच्या पानांचा रस आणि तांदूळ धुतलेले पाणी दोन्ही मिसळून नागवेडा झालेल्या भागावरती लावल्यास कमी होतो. तसेच चंदनाची पेस्ट देखील नाग वेडा बरा होण्यासाठी महत्त्वाची ठरते. कडुलिंबाची पाने या त्वचा विकारासाठी अत्यंत गुणकारी ठरतात .कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात पाणी घालून त्याचा लेप नाग वेड्यासाठी पूरक ठरतो.

नाग वेडा झाल्यास घ्यावयाची काळजी…

नाग वेडा झाल्यास प्रारंभीच्या काळात लक्ष दिले तर पटकन बरा होऊ शकतो .चाळीस दिवसानंतर पुरळ जास्त वाढत जाते असे त्वचारोग तज्ञ सांगतात. त्यामुळे नागवेडा झाल्यास पटकन उपचार सुरू करावेत असे डॉक्टर सांगतात. नाग वेडा हा काही जीवघेणा आजार नाही पण साधारण दोन ते सहा आठवडा बरा होण्यासाठी कालावधी लागतो. त्यासाठी हा विकार होऊ नये म्हणून त्वचेची काळजी घ्यायला हवी .नागवेडा झाल्यास त्वचा खूप खाजते. पण खाजवल्यास अधिक जलन होते किंबहुना तो अधिक पसरतो देखील .त्यामुळे नाग वेडा खाजवु नये. तसेच अंघोळीनंतर नाग वेडा झालेली जागा कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायला हवी जेणेकरून तो पसरणार नाही यासाठी काळजी घ्यायला हवी.

Team Global: