नागवेपणा झाकण्यासाठी असा नटूनथटून मिरवण्याच्या… पुन्हा प्रकाश राज यांचा मोदींना टोला

 

अभिनेते प्रकाश राज हे अभिनयासह स्पष्टवत्तेपणासाठी ओळखले जातात. ते ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. अलीकडेच त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो शेअर करत आपले नागवेपण झाकण्यासाठी असा नटूनथटून मिरवण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशी खिल्ली उडवली आहे.या ट्विटमुळे काही युजर्सनी प्रकाश राज यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

पंतप्रधान मोदींचे वेगवेगळ्या पेहरावातील 20 फोटो प्रकाश राज यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. यापैकी अनेक फोटोंमध्ये मोदींनी डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या घातलेल्या आहेत किंवा वस्त्र गुंडाळलेली दिसत आहेत. याच फोटोचा संदर्भ देत अती कपडे परिधान करणे ही नग्नत्व झाकण्याची नवीन पद्धत आहे का, अशा अर्थाचे ट्विट त्यांनी केल आहे. ‘ओव्हर ड्रेसिंग… इज दी न्यू न्यूडीटी’ अशी कॅप्शन ट्विट केलेल्या पह्टोंना वापरण्यास अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काही युजर्सनी प्रकाश राज यांच्या चित्रपटातील सीनमधील फोटो शेअर करत त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिनेता प्रकाश राज यांची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये काँग्रेसच्या राजवटीत युरियाचा प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप मोदी करत होते. तसेच भाजपा सरकाने त्यावर अंकुश आणल्याचं म्हटलं होतं. त्यावर ‘आता सगळीकडे भ्रष्टाचार 40 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के’ अशी पॅप्शन टिपणी प्रकाश राज यांनी केली होती.

Team Global News Marathi: