नाव, नेता चोरणाऱ्या बहाद्दरांनो… ; अंबादास दानवेंनी साधला शिंदे गटावर निशाणा

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्षचिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. आयोगाकडून ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला. शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाले मात्र शिंदे गटाला अद्यापही चिन्ह मिळू शकले नाही. यावरूनच दानवे यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले.


अंबादास दानवे ट्विटमध्ये म्हणाले की, “नाव, नेता आणि चिन्ह चोरू पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो, तुमचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस आणि तुमची मातृसंस्था भाजपला पटकन विचारून चिन्ह आज तरी अंतिम करा. स्वतःचे तुमच्याकडे काहीच नाही! अशा शब्दात त्यांनी शिंदे गटाला धारेवर धरले. यापूर्वी सुद्धा अंबादास दानवे यांनी शिंदे गटवार घणाघाती टीका केली होती.

दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले आहे. तर ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले . यासोबतच ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.

Team Global News Marathi: