माझा राग श्रीकांत शिंदेंवर नव्हता, खासदार संभाजीराजेंचे स्पष्टीकरण

शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला रोषणाईवर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी टीका केली होती.  या टीकेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले होते . यावर आता खासदार संभाजीराजेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

संभाजीराजे म्हणाले की, रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईसंदर्भात मी टीका केल्यानंतर अनेक शिवभक्तांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पुरातत्व खाते रायगडावरील एखादा दगड हलवायचा म्हटलं तरी परवानगी देत नाही. मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष असल्याने अनेक कामांच्यावेळी असा अनुभव आला आहे. एरवी लहानसहान गोष्टींबाबत दक्ष असणाऱ्या पुरातत्व खात्याला महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात सौम्य रोषणाई असावी, एवढीशी गोष्टही समजली नाही का? असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

Team Global News Marathi: