‘माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी

 

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना आता खासदार छत्रपती संभाजीराजे आज पासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, आज आमरण उपोषणाला मी एकटाच बसणार आहे. मराठा समाजाला वेठीस धरु नये, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

पुढे बोलताना राजे म्हणाले की, आज आझाद मैदानावर मी एकटाच या उपोषणाला बसणार होतो, मात्र अनेकजण आले आहेत. मला पाठिंबा म्हणजे शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या घराण्याला पाठिंबा आहे. माझा लढा हा 30 टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी माझा लढा असल्याचे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत ही वेळ यायला हवी नव्हती परंतू, सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी रहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: