मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू – सतेज पाटील

 

कोल्हापूर | भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षाविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमय्यांनी मुश्रीफांवर आरोप केल्यानंतर त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. त्यतच्च आता पालकमंत्री सतेज पाटील हे सुद्धा मुश्रीफ यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी किरीट सोमय्यांना इशारा देताना मुश्रीफांना पाठिंबा दिला आहे. मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली आहे. तसंच इथल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरचा दौरा टाळावा, असं आवाहन देखील सतेज पाटलांनी सोमय्यांना केलं आहे.

पाटील म्हणले की, सोमय्यांनी मुश्रीफ साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु मुश्रीफ साहेबांनी यावर खुलासाही केलाय. त्यामुळे खुलासा केल्यानंतर त्यांनी पुन्हा दौरा काढण्याची काही गरज नाही, मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, अशी भूमिका मंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे.

Team Global News Marathi: