मुंडे बहिण- भावाचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल; वाचा काय आहे प्रकरण

 

बीड | भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि त्यांचे बंदी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वाद बीड जिल्ह्याला नाही ता संपूर्ण राज्याला माहिती आहे. तसेच पंकजा आणि धनंजय मुंडे एकमेकांवर टीका करण्याची एकहाती संधी सोडताना दिसून येत नाहीये. त्यातच बीड जिल्ह्यातील विविध मुद्यावरून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना अनेकवेळा दिसून आल्या होत्या.

मात्र दुसरीकडे सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला फोटो आहे बीडमधील मुंडे भावा-बहिणीचा. सर्वांनी आतापर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील शाब्दिक युद्ध नेहमी पाहायलं आहे. या फोटोत एका विवाह सोहळ्यादरम्यान दोघं एकत्र एकाच छताखाली आल्याचं दिसलं.या लग्न सोहळ्यात दोघंही जवळपास दोन तास एकत्रित बसले होते.

धनंजय मुंडे तसंच पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहीवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दोघं भावडं एकत्रित दिसले. लातूरमधील कार्निवल हॉटेल येथे हा विवाह सोहळा पार पडला. धनंजय मुंडे सकाळपासून उपस्थित होते. तर दुपारनंतर पंकजा मुंडे या त्यांच्या ताई प्रज्ञा यांच्या सोबत आल्या.

Team Global News Marathi: