मुंबईत वेश्याव्यवसाय प्रकरणी भोजपुरी अभिनेत्रीला अटक,

 

सेक्स रॅकेट प्रकरणी भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला अटक केली आहे. वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी तिला अटक केली आहे. सुमन कुमारी अनेक सिनेमांत झळकली आहे. भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील सुमन कुमारी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने लैला ‘मजनू’ आणि ‘बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ सारख्या अनेक भोजपुरी सिनेमांत काम केलं आहे.

सुमन अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील आहे. तिने भोजपुरी, हिंदीसह पंजाबी भाषेतील गाणी गायली आहे. ओटीटीवरील अनेक प्रोजेक्टमध्येदेखील सुमनने काम केलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून सुमन मुंबईत राहत आहे. पण वेश्याव्यवसायात काम करायला तिने कधी सुरुवात केली हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या वृत्तामुळे भोजपुरी फ्लीम जगतात एकचं खळबळ उडाली आहे.

24 वर्षीय भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीला 21 एप्रिल 2023 रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना (मॉडेल्स) मनोरंजनसृष्टीत काम करण्याची संधी देते असं सांगून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असल्याने पोलिसांनी सुमनला अटक केली आहे. पोलिसांनी आता तीन मॉडेल्सची सुटका केली असून सध्या ते या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

एका अधिकाऱ्याला मुंबईतील वेश्याव्यवसायासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर एका ऑपरेशन अंतर्गत रॉयल पाल्म हॉटेलवर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी काही मॉडेल्स वेश्याव्यवसायासाठी पुरवल्या जात होत्या. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,”सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी तसेच चांगलं करिअर बनवण्यासाठी मुंबईत आलेल्या नवोदित महिला कलाकारांना वेश्याव्यवसायात ढकललं जात होतं.

Team Global News Marathi: