मुंबईत परप्रांतीय महापौर कदापी होऊ देणार नाही, मनसे नेते सतीश नारकर यांचा सूचक इशारा

 

मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला तर दुसरीकडे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपा नेते मोहित कंबोज याने थेट राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर लवकरच सिंचन घोटाळ्याप्रकरणी कारवाई होणार असल्याचे संकेत दिले होते मात्र कोणत्याही केंद्रीय यंत्रणाचा भाग नसलेल्या भाजपा नेता मोहित कंबोज याला ही माहिती कोठून मिळते अशी विचारणा आता सर्व स्थरातून होऊ लागली आहे.

तर दुसरीकडे येणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीत मोहित कंबोज याला भाजपा मुंबई मनपाचा महापौर पदाचा चेहरा बनवून काहीतरी खेळी खेळत असल्याची चर्चा होऊ लागली आहे यावर आता मनसे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच मुंबईत कोणीतरी बाहेरचा परप्रांतीय येऊन महापौर पदाच्या खुर्चीवर बसणार असेल तर त्याला मनसे स्टाईलने उत्तर देऊ अशी धमकी वजा इशाराच दिला आहे.

आज मोहित कंबोज यांनी ज्या-ज्या नेत्यांवर आरोप लागले आहेत त्या-त्या सर्व नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली मात्र ही गोपनीय माहिती कंबोज यांना कोठून मिळते असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतं आहे तर कोणत्याही शासकीय पदावर नसताना माजी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी कंबोज यांचे शासकीय गाडीतून जाणे-येणे अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

या संदर्भात थेट सतीश नारकर यांनी ट्विट करून आशिष शेलार यांनाच प्रश्न करत कंबोज यांना सूचक इशारा दिला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, आशिषजी, हे कस? 100% strick rate ला माहिती मिळते कुठून? शिवसेना बंडखोरीचा साक्षीदार, ED चा माहितगार आणि आज तर IPS व IAs चा साथीदार म्हणुन फडणवीसांकडे जाणारा हा आहे तरी कोण? कोणीही असो पण उद्या BMCचा hero बनवायचा प्रयत्न झाला तर मात्र कसा आपटायचा ते मराठी माणसाला चांगला माहिती आहे

Team Global News Marathi: