मुंबई दौऱ्यावर असलेल्या ममता बॅनर्जींचा थेट राहुल गांधींवर हल्ला

 

तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी सिव्हिल सोसायटी सदस्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यासहित शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मेधा पाटकर, तुषार गांधी असे कला, सामाजिक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. मात्र यावरी त्यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला होता.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेशवारीवरुन नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘जर तुम्ही अर्ध्याहून अधिक काळ जर परदेशात राहिलात तर राजकारण कसे काय कराल?’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. मात्र, असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाल्याचं पहायला मिळत आहे. देशातील विधानसभा निडणुका असोत किंवा देशातील लोकसभा निवडणुका असोत सर्वत्र काँग्रेस पक्षाची वाताहत झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस अध्यक्षपदावरुनही वाद सुरू असून एक ठोस नेत्रृत्वही नाहीये.

या सर्वांमुळे भाजपला रोखण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षच नसल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, जर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवू शकते तर मी गोव्यात काँग्रेसच्या विरोधात का निवडणूक लढू शकत नाही? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: