कोरोनाच्या धास्तीने रेल्वे प्रवासाला नागरिकांचा कमी प्रतिसाद

मुंबईत सर्वसामान्य नागरिकांसाठी १ फेब्रुवारी पासून प्रवासाची मुभा राज्य सरकारकडून देण्यात आली होती. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून लोकल प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड उडाली होती. मात्र मागच्या आठवड्यात मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या धास्तीने लोकल प्रवासाला आता प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत एकूण २ लाखांनी घट झाली आहे. तर वातानुकूलित लोकल प्रवासीसंख्याही ५ हजारांहून १ हजारांवर पोहोचली आहे. त्यात पुन्हा लॉकडाउनचा इशारा आणि राज्यातील काही शहरांत लागू झालेले लॉकडाउन यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १८ तारखेला ती १७,०७,६२२ पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १८ फेब्रुवारीच्या प्रवासी संख्येत एक ते दीड लाखांची घट झाली.

Team Global News Marathi: