मुंबई मनपाच्या इलेक्ट्रिक बस खरेदी कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा भाजप आमदाराचा आरोप

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु झालेले असताना आता मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रीक बसे खरेदी कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.

या प्रकरणाची चौकशी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे रितसर तक्रार दाखल करून करणार, असेही कोटेचानी म्हटले. कोटेचा म्हटले, “आदित्य सेना मुंबई महानगर पालिकेत भ्रष्टाचार करण्याची एकही संधी गमावत नाही. काही करून आपल्या मर्जीतील ठेकेदार व कंपन्या यांनाच कंत्राटे मिळाली पाहिजे, याची संपूर्ण सोय प्रशासनाला दबावात आणून केली जाते,” असेही त्यांनी म्हटले.

कोटोचा म्हटले, “पालिकेने १४०० ईलेक्ट्रीक बसेस खरेदी कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक दिले आहे. तसेच केंद्र सरकारने २३४ कोटी राज्याच्या खात्याच जमा झाल्यानंतर सुद्धा नेहमीप्रमाणे केंद्र सरकार पैसा देत नाही म्हणून बोंब राज्य सरकार मारत आहे. आणि दुसरीकडे टक्केवारीसाठी लगबगीने सोयीस्कर निविदा काढायच्या. पण लक्षात ठेवा भाजपा असे होऊ देणार नाही.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मिळालेल्या केंद्र सरकारच्या निधीवर तुम्हाला टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही. आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सिव्हीसी आणि कॅग यांच्याकडे आम्ही रितसर तक्रार दाखल करणार, असे त्यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: