मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेला आव्हान, या नगरसेवकाची कोर्टात धाव |

 

मुंबई | मुंबई महापालिकेची सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या नऊने वाढवून २३६ इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्या निर्णायाला नगरसेवक अमित सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेची मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपणार आहे.

तसेच राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई पालिकेची सध्याची २२७ ही नगरसेवक संख्या नऊने वाढवून २३६ इतकी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. लोकसंख्येत झालेली वाढ, वाढते नागरीकरण लक्षात घेऊन मुंबईतही नगरसेवक संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळाने घेतली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात ३.८७ टक्के इतकी लोकसंख्या वाढ २००१ ते २०११ या काळात झालेली होती. त्याआधारे २०२१ पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून नगरसेवक संख्या वाढविण्यात आली आहे. त्याला भाजपा नगरसेवक अमित सावंत यांनी आक्षेप घेत रीट याचिका दाखल केली आहे. नव्याने जनगणणाकडून प्रभाग रचनेसह सदस्यांची संख्येत वाढ कऱणे अपेक्षित आहे. २०२२ साठी २०११ च्या जनगणणेला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे ही प्रभाग रचना घटनाबाह्य आणि असंविधानिक असल्याचा दावा सावंत यांनी याचिकेतून केला आहे. सदर याचिकेवर येत्या गुरुवारी सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

Team Global News Marathi: