‘मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग सोबतचेही सोडून का गेले?

 

राज्याच्या मुख्यमंत्री पदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे यांना केला. जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते अपक्ष म्हणून विजयी झाले व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.

‘महाविकास आघाडीत अडीच वर्षे गळचेपी झाली. सहनशीलतेचा अंत झाला, त्यामुळेच उठाव केला. आम्ही पक्षातच असून, उध्दव ठाकरे यांच्या जवळच्या लोकांकडूनच शिवसेना संपविण्याचा डाव आहे,’ असा हल्लाबोल माजी मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शंभूराज देसाई १५ दिवसांनंतर बुधवारी प्रथमच साताऱ्यात आले.

तसेच शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी शंभूराज देसाई यांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला होता तत्पूर्वी शिवसेनेच्या अनेक बंडखोर आमदारांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता तसेच खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा संजय राउतनाचा समाचार घेतला होता.

Team Global News Marathi: