मुख्यमंत्र्यांच्या सभेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी, शिवसेनेची जोरदार तयारी

 

मुंबई | येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचा दुसरा टीझर शिवसेनेकडून ट्विट करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेनं या बैठकीचा पहिला टीझर जारी केला होता. आज शेअर केलेल्या टीझरमध्येही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरण्यात आला आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही दिसत आहे.

शिवसेनेनं हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. पहिल्या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश वापरण्यात आला आहे. तसंच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावता भाषण केले आणि 14 तारखेच्या सभेत मनात बरचं साचलंय ते बोलणार आहे, असा विरोधकांना इशाराही दिला.

मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये आणि निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मास्क काढून जोरदार भाषण केलं. आता आपण माणसात आलोय असं वाटतंय कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे, तसा मास्क काढायचा आहे तो १४ तारखेला काढायचा आहे.

Team Global News Marathi: