मुख्यमंत्री नांदेडला येतात पण शेतकऱ्यांकडे जात नाहीत, हे काही योग्य नाही

 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असतानाच, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पंकजा यांच्या वक्तव्याला अनुसरुन वक्तव्य केलं आहे. “तुम्ही आमचं ऐका किंवा ऐकू नका, किमान पंकजा मुंडे यांचं तरी नीट ऐकावं, अशी अपेक्षा आहे,” असं अशोक चव्हाण भाजपला उद्देशून म्हणाले.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी चेहरा असलेल्या आणि मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. याबद्द विचारलं असता त्यांनी थेट नाराजी व्यक्त न करता त्यांनी टोला लगावला. “कदाचित माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल,” असा पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्रातील नवीन शिंदे सरकार स्थिर नसून निर्णय प्रक्रियांनाही विलंब केला जात आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमधील निर्णयांना स्थगिती दिली जाते आहे तर नवीन निर्णय घेतले जात नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी 40 दिवस लागल्यानंतर, पालकमंत्र्यांची अजून नियुक्ती नाही, शिवाय खाते वाटपाचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचं हे चित्र आहे.

अतिवृष्टीने महाराष्ट्रात फार विदारक अवस्था असून मुख्यमंत्री नांदेडला येतात पण शेतकऱ्यांकडे जात नाहीत, हे काही योग्य नाही. पण मुख्यमंत्र्यांनी नुसतं मोबाईल फोनवरुन बोलून चालणार नाही तर त्यांचे आदेश कृतीत उतरवणं देखील गरजेचं आहे. नाहीतर त्यांचं हे बोलणं मोबाईलपुरतंच मर्यादित राहिल, असा खोचक टोला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

Team Global News Marathi: