मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढणार, पोलिसात तक्रार दाखल

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादचा दौरा केला होता. पण, त्यांचा हा दौरा आता वादात सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादेत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती.

औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण केल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृती केल्याची तक्रार केली आहे. शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होते, असा दावाही कस्तुरे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार स्वीकारली आहे, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा सुरू होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडून उभारण्यात आलेल्या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचच नाव देण्यात आलं आहे.मात्र या नावाचा ठराव त्यांनी महापालिकेत दिला असला तरी त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यातच हे उद्यान महापालिकेच्या जागेवर खाजगी विकासाकडून विकसित करण्यात आलं आहे. त्यासाठीची हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया ही अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री वादात सापडलेल्या उद्यानाचं उद्घाटन करणार का असा प्रश्न आहे.

Team Global News Marathi: