Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

MRF शेअर एका दिवसात घेतली तुफान उसळी , गुंतवणूकदारांना लागलेली लॉटरी खरेदी करण्याची चढाओढ

by Team Global
August 4, 2023
in देश विदेश
0

भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात पडझड सुरू झाली, ज्यामुळे गेल्या महिन्यात मार्केटने घेतलेली आघाडी धुवून निघाली. एकीकडे मार्केटमध्ये घसरण होत असताना भारताचा सर्वात महागडा स्टॉक आणि टायर निर्माता कंपनी एमआरएफ लिमिटेडने जून तिमाहीत मजबूत नफा नोंदवला. कंपनीचा नफा वार्षिक आधारावर जवळपास पाच पटीने वाढून ५८८.७५ कोटी रुपये झाला जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १२३.६ कोटी रुपये होता. मुख्यत्वे कमाईत वाढ आणि कच्च्या मालाच्या किमतीत घट झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली.

MRF चे तिमाही निकाल
MRF लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ऑपरेटिंग उत्पन्न रु. ५,६९५.९३ कोटींवरून रु. ६,४४०.२९ कोटी झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत ४,११४.०६ कोटी रुपयांच्या तुलनेत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची किंमत ३,७८०.६७ कोटी रुपयांवर आली आहे. तथापि, MRF लिमिटेडचा एकूण खर्च मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. ५,५६६.६३ कोटींवरून वाढून रु. ५,७२७.९२ कोटी झाला आहे.

MRF शेअरचा नवीन उच्चांक
MRF हा देशातील सर्वात महागडा स्टॉक असून त्याच्या किंमतीने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. गुरुवार, आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी, टायर कंपनीच्या शेअरची किंमत १०७,५०० रुपयांवर पोहोचली, जो स्टॉकचा सर्वकालीन उच्चांक आहे. तर दिवसाच्या व्यवहार दरम्यान स्टॉकने चार हजार ८६० रुपयांनी उसळी घेतली असताना BSE वर बंद किंमत एक लाख ६ हजार ९२३.१० रुपये होती. म्हणजे त्यात काल दिवसभरात ४.१७% वाढ झाली. दरम्यान, स्टॉकच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर गेल्या एका महिन्यात कंपनीच्या स्टॉकने सुमारे ५.६%, तीन महिन्यांत सुमारे १३% तर यावर्षी आतापर्यंत सुमारे २०% वाढ नोंदवली आहे.

MRF कंपनीबद्दल सर्वकाही जाणून घ्या
एमआरएफ वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, टायर्स व्यतिरिक्त कंपनी आपल्या उत्पादनांमध्ये स्पोर्ट्सच्या वस्तू देखील बनवते. याशिवाय, पोर्टफोलिओमध्ये पेंट्सचा देखील समावेश आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post

आरसीबी संघाने केली नव्या वर्ल्ड चॅम्पियन परीक्षणाची घोषणा तर दोन दिग्गजांना संघाकडून नारळ

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group