फडणवीस साहेब बघा तुमचं वजन वापरून राज्याला काय मिळतं का? – डॉ जितेंद्र आव्हाड

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी वाढत असलेली रुग्णसंख्या राज्यात पुन्हा एकदा राज्याला लॉकडाऊनच्या उंबरड्यावर आणूं ठेवले आहे असे भाष्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविले होते.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून लॉकडाऊन झालेल्या देशांत देण्यात आलेल्या जाहीर पॅकेजचा उल्लेख करत काही देशातील उदाहरणही डेली होती. आता देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या उत्तराला राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. फडणवीसांनी दिलेल्या सल्ल्यावरून त्यांनी टोलाही लगावला आहे.

. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांचा मुद्दा खोडून काढतानाच केंद्र सरकारवरही निशाणा साधला. “…पण हे सगळं तिथल्या केंद्र सरकारनी केलं आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाहीत. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून…,” असं म्हणत आव्हाडांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: