मोठी बातमी | संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी

 

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती.

हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला दिसत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवत हे सरकार नामर्दच असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही राऊतांनी केली होती. शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या दारातील पायपुसणं आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवल निशाणा साधला होता.

Team Global News Marathi: