मोठी बातमी | नवनीत राणा तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात दाखल

 

मुंबई | खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे स्पॉन्डॅलिसिसचा त्रास सुरू असल्याने नवनीत राणा या तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आमदार रवी राणा यांचीही काहीच वेळात सुटका होणार आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांची सुटका करण्यात आली. तुरुंगात असतानाच त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

तुरुंगात असताना आपल्याला स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याचं वारंवार सांगूनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे. दरम्यान, त्या सध्या लीलावती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना बाहेर सोडायचं की उपचार सुरू ठेवायचे हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Team Global News Marathi: