मोठी बातमी | आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटिओ टेस्टची गरज नाही

 

ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याची प्रक्रिया थो़डी मनस्ताप देणारी आहे. मात्र, आता शासनाच्या नवीन अध्यादेशानूसार हे काम सोप्पे झाले आहे. युनियन मिनिस्ट्री ऑफ रोड अँड मोटारवेजने नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने आता हे काम खूपच सोप्पे झाले आहे. हे नवीन नियम या महिन्यापासून म्हणजे जुलै पासून लागू करण्यात येणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स काढा म्हणजे, आरटीओत अर्ज करा, नंतर शिकावू लायसन्स मिळते. त्यानंतर परीक्षा द्या आणि निकाल लागल्यानंतर एक-दोन महिन्यांनी आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तासंतास रांगेत तात्कळत उभे रहा, आदी अडचणी होत्याच. आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही.

आरटीओ मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट न देता ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. पण त्याचबरोबर आता आरटीओऐवजी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचे महत्व वाढणार आहे. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना सशक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्यांना आता ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरकडून प्रमाणपत्र मिळणार आहे.

या नवीन ट्रेनिंग सेंटर्सची वैधता पाच वर्षांची असणार आहे. या पाच वर्षांनंतर त्यांचे पुन्हा नुतनीकरण करावे लागणार आहे. ही ट्रेनिंग सेंटर्स किंवा प्रशिक्षण केंद्रे राज्य परिवहन प्राधिकरण किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत असतील. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज या सेंटर्सवर करावा लागणार आहे. याच सेंटरवर टेस्ट देखील घेतली जाणार आहे. ही सेंटर्स जे प्रमाणपत्र देतील, ते घेऊन आता आरटीओकडे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट विरहीत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे.

पुण्यातील एका प्रियकराने तिच्यासाठी एक-दोन नाही तर तब्बल 15 गाड्या चोरल्या

गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींची दक्षिणा

Team Global News Marathi: