मोठी बातमी | सत्यजित कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, मात्र छाननीत ठरला वैध

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांवर शुक्रवारी झालेल्या छाननीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या उमेदवारी अर्जावरील काँग्रेसचे उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप नोंदवला असून तो बॅड करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मात्र निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कदम यांचा अर्ज वैध ठरविला. कदम समर्थकांची अस्वस्थता चांगलीच वाढली. छाननीत जयश्री जाधव यांच्यासह १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. दोघांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. कदम यांनी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर उमेदवार जाधव यांचे प्रतिनिधी संजय शेटे यांनी हरकत घेतली.

संजय कदम यांनी नामनिर्देशन पत्रासोबत दाखल केलेले शपथपत्र नोटरीच्या कायद्यानुसार होत नाही. शपथपत्रावरील नोटरीचा शिक्का गोल नसून अंडाकृती आहे. यामुळे कदम यांचा अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी हरकत घेतली. यावर कदम यांचे वकील विनायक रणखांबे व सुनील कदम यांनी शेटे यांच्या हरकतीस लेखी उत्तर दिले. हरकत निवडणूक अर्ज त्यातील माहिती संबंधित नाही. नोटरी कायद्याप्रमाणेच केली आहे. हरकतीसोबत कोणताही कागदोपत्री पुरावा जोडलेला नाहीत. यामुळे कदम यांचा अर्ज वैध ठरवावा, असे उत्तर दिले.

Team Global News Marathi: