आजोबा म्हणाले, दौरे टाळा, तरीही नातू चिपळूण दौऱ्यावर, सदाभाऊ खोत यांनी लगावला टोला !

 

दोंनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागाचा दौरा न करण्याचा सल्ला दिला होता. या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर ताण येत असल्याचे कारण पवारांनी दिले होते. माता दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार सध्या चिपळूण आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे याच मुद्द्यावरून आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. आजोबांच्या आवाहनानंतरी त्यांचे नातू आमदार रोहित पवार चिपळूणच्या दौऱ्यावर गेले. मग आजोबांचा सल्ला नातवाला मान्य नाही का? की हे सल्ले फक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच होते असा टोला खोत यांनी पवारांना लावला होता.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आजोबांनी सांगितले… राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे करून नयेत. आजोबांच्या सल्ल्याला नातवाच मान नाही आणि जामखेड चे आमदार चीपळूनच्या दौऱ्यावर. की आजोबांचा हा सल्ला फक्त राज्यपाल व फडणवीसांकरिता होता? असा टोला लगावला होता.

 

Team Global News Marathi: