महिन्याचे पैसे घेऊन २८ दिवसच सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांच्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरणार

 

मुंबई | राज्यात टेलिकॉम कंपन्यांकडून होणाऱ्या फसवणुकीवर आज तागायत ग्रहणांक्की तक्रारी केल्या आहेत मात्र याची दाखल आजपर्यंत कोणीही घेतलेली नव्हती मात्र आता सर्रास लुटणाऱ्या आणि ग्राहकांना जास्तीत जास्त फायदे देण्याचा दावा करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांचं पितळ आता मनसे उघडे पाडणार आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या प्लानच्या वैधतेवरच मनसेने आता सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टेलिकॉम अध्यक्ष सतीश नारकर यांनी माहिती दिली आहे.

टेलिकॉम कंपन्या त्यांच्या महिन्याभराच्या रिचार्जची वैधता २८ दिवसच का ठेवतात? वरचे २ दिवस का कमी असतात? असा सवाल नारकर यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले २८ दिवसांच्या या रिचार्ज मागचे कारण, म्हणजे वर्षाचे ३६५ दिवस भागिले २८ दिवस म्हणजे १३ महिने होतात. याचाच अर्थ या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना १२ ऐवजी १३ महिन्याचा रिचार्ज करायला भाग पाडतात.

या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहक विरोधी स्ट्रॅटेजीच्या विरोधात ग्राहकांच्या हक्कासाठी या कंपन्यांच्या मनमानी आणि फसव्या कारभारावर महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आता रस्त्यावर उतरणार आहे. आज जर वर्षभराच्या रिचार्जचा विचार केला तर या बड्या कंपन्या एका महिन्याचे पैसे कोणतीही सेवा न पुरवता सामान्य ग्राहकांना फसवून वसूल करत आहेत. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे टेलिकॉम अध्यक्ष सतीश नारकर यांनी केला आहे.

Team Global News Marathi: