१४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बदलणार पैशाशी संबंधित नियम थोडं पण कामाचंआरबीआयने पैशाच्या देवाण-घेवाणीबाबत मोठी घोषणा केली आहे.RTGS सिस्टीम १४ डिसेंबरपासून २४ तास सुरू राहणार आहे.
RTGS सिस्टीमचा वापर ट्रान्झॅक्शनसाठी केला जातो
मुंबई: कोरोनाकाळात(corona) डिजीटल पेमेंट(digital payment) मोठ्या प्रमाणात होऊ लागले. देशात डिजीटल देवाण-घेवाणीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक(RBI)ने नुकतेच सांगितले होते की मोठ्या देवाण-घेवाणीसाठी वापरण्यात येणारी रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट(RTGS)सिस्टीम १४ डिसेंबरपासून २४ तास काम करणार आहे. RTGS सिस्टीम सध्या दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आणि रविवारी सोडून आठवड्याच्या सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करते. RTGS सिस्टीमचा वापर मोठ्या रकमेच्या देवाण-घेवाणीसाठी केला जातो.
१४ डिसेंबर २०२०च्या मध्यरात्रीपासून RTGSची सुविधा २४ तास
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) ने मॉनेटरी पॉलिसी कमिटी(एमपीसी)च्या द्विमासिक समीक्षक बैठकीनंतर घोषणा केली. RTGS सिस्टीम ७ दिवस २४ तास उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेने म्हटले की RTGS सिस्टीम वर्षभर ३६५ दिवस २४ तास उपलब्ध केली जाणार आहे आणि याची सुरूवात १४ डिसेंबर २०२०च्या मध्यरात्री ००.३० वाजल्यापासून होईल.
पेमेंट सिस्टीम चालवणाऱ्या कंपन्यांना मिळणार लाँग टर्म लायसन्स
एक इतर पेमेंट सिस्टीम NEFT याआधीच २४ तास उपलब्ध आहे. RBIने पेमेंट सिस्टीम चालवणाऱ्या कंपन्यांना लाँग टर्मवर लायसन्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ५ हजार रूपयांपर्यंत कॉन्टॅक्टलेस देवाण-घेवाण
यासोबतच RBIने कॉन्टॅक्टलेस देवाण-घेवाणीची मर्यादा वाढवून ५ हजार रूपये केली आहे. दास यांनी म्हटले की डिजीटल पेमेंटला सुरक्षित पद्धतीने चालना देण्यासाठी UPI अथवा कार्डच्या मदतीने कोणताही संपर्क न करता केली जाणारी देवाण-घेवाणीची मर्यादा एक जानेवारी २०२१ पासून २हजार रूपयांवरून वाढवून ५ हजार रूपये केली जाईल. RBIकडून याबाबतचे विविध आदेश जारी केले जातील.
NEFT आणि RTGSच्या देण्याघेण्यावर चार्ज आकारणी बंद
देशातील डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यसाठी RBIने जुलै २०१९पासून NEFT आणि RTGSच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या देण्या-घेण्यावर शुल्क आकारणी बंद केले आहे. NEFTचा वापर दोन लाख रूपयांपर्यंतच्या देवाण-घेवाणीसाठी केला जातो. तर मोठ्या व्यवहारासाठी RTGSचा वापर केला जातो.
आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी बनवले जाणार सेंटर
RBI गर्व्हनरने सांगितले की लोकांमध्ये आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक साक्षरता केंद्र(सीएफएल) १०० ठिकाणी काम करत आहेत. ते म्हणाले मार्च २०२४ पर्यंत सर्व ठिकाणी अशी केंद्रे बनवली जाणार आहेत.