4 राज्यांत विजयानंतर बोलले मोदी: म्हणाले आजचा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी

4 राज्यांत विजयानंतर बोलले मोदी: म्हणाले आजचा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी

आज उत्सावाचा दिवस आहे. हा उत्साव भारताच्या लोकशाहीचा असून, सर्व मतदात्यांचे मी आभार मानतो. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदात्यांचे आभार मानले. यंदाची होळी 10 मार्चपासून सुरू झाली असून, कार्यकर्त्यांनी आपले वचन पुर्ण केले. त्यासाठी मी त्याचे आभार मानत त्यांना शुभेच्छा देतो. असे मोदी म्हणाले.

देशाने उत्तर प्रदेशला अनेक मुख्यमंत्री दिलेत पण त्यांचा कार्यकाळ पाच वर्षापेक्षा जास्त राहू शकला नाही. मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पुन्हा एकदा विजय झाला असून, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. इतर राज्यात देखील भाजपच्या मतांमध्ये वाढ होत असून, हा भाजपचा विजय असल्याचे मोदी म्हणाले.

गोव्यात सर्व एक्झिट पोट खोटे ठरले असून, गोव्यात भाजपचा विजय झाला असून, गोव्यात तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर आले आहे. उत्तराखंडमध्येही इतिहास घडला असून, तेथेही दुसऱ्यांना भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. माँ गंगाने भाजपला आशिर्वाद दिला आहे. असे मोदी म्हणाले.

भाजपच्या शासनावर मतदारांनी मोहोर, त्यामुळे भाजपच्या जागांचा टक्का वाढला आहे. भाजपने शेवटच्या माणसापर्यंत सुविधा दिल्या. आम्ही गरिबांपर्यत सोयीसुविधा पुरवतो. देशाचा कल्याण हाच जीवानाचा मंत्र असून, देशातील सर्व स्त्रियांनी भाजपला आशिर्वाद दिला असल्याचे मोदी म्हणाले.

यूपीच्या जनतेने विकासाला निवडले

उत्तर प्रदेशातील जनतेला जातीपातीत विभागल्या गेले होते. ज्ञानी लोकांनी युपीला बदनाम केले. त्यामुळे युपीच्या जनतेने विकासाला निवडले आहे. 2022 च्या निकालाने 2024 चे निकाल स्पष्ट केले आहे. असे भाकित मोदी यांनी केले आहे.

या निवडणुका अशा वेळी झाल्या ज्यावेळी, संपूर्ण जग 100 वर्षांतील सर्वात मोठ्या कोरोना महामारीशी लढत आहे. मध्यंतरी कोरोनाचा वेग काहीसा मंदावला होता. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने जगाची चिंता वाढली होती. अशा परिस्थितीत जगभरातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. 2 वर्षांपासून पुरवठा साखळीवर खूप विपरित परिणाम झाला आहे आणि युद्धामुळे ती आणखी वाईट झाली आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने उचललेली पावले, आर्थिक स्तरावर घेतलेले निर्णय, गरिबांच्या कल्याणासाठी घेतलेले निर्णय यामुळे भारताला सुरक्षितपणे पुढे जाण्यास मदत मिळाली आहे.

ज्या ठिकाणी डबल इंजिन सरकार आहे तिथे जनतेचे हित जपले गेले. जे युद्ध चालू आहे त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जगातील प्रत्येक देशावर परिणाम होत आहे. मात्र, भारत देश हा शांततेच्या बाजूने आहे. प्रत्येक समस्या चर्चेने सोडवण्याच्या बाजूने आहे, जे देश थेट युद्ध लढत आहेत, त्यांच्याशी भारताचे आर्थिक, सुरक्षा, शैक्षणिक, राजकीय संबंध आहेत. भारताच्या अनेक गरजा या देशांशी संबंधित आहेत. भारत जे कच्चे तेल, पामतेल, सूर्यफूल तेल बाहेरून आयात करतो, त्याची किंमतही वाढत आहे. असे मोदी म्हणाले.

पुढे मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांनी त्यांची दूरदृष्टी दाखवून दिली आहे. या निवडणुकांमध्ये भारतातील मतदारांनी ज्या प्रकारे स्थिर सरकारांना मतदान केले, ते भारतीयांच्या मनात लोकशाही असल्याचे स्पष्ट आहे. बंधू आणि भगिनींनो, आज या निमित्ताने मला माझ्या काही चिंता देशासमोर ठेवायच्या आहेत. देशाचा नागरिक मोठ्या जबाबदारीने देशहिताचे काम करत असतो. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते तेव्हा तो जबाबदारीने वागतो. देशाचा सामान्य नागरिक राष्ट्र उभारणीत गुंतलेला आहे, पण आपल्या देशातील काही लोक राजकारणाची पातळी सतत खालावत आहेत.

कोरोनाच्या या काळातही लोकांनी सतत देशवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे आपण पाहिले आहे. लसीकरणाच्या आमच्या प्रयत्नांचे जग कौतुक करत आहे, पण या पवित्र आणि मानवतावादी कृतीवर भारताच्या लसीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. हजारो भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. तेव्हाही हे लोकं देशाचे मनोधैर्य खचल्यासारखे वक्तव्य करत होते. तिथे अडकलेल्या नागरिकांची चिंता वाढवण्याचे काम यांच्याकडून सुरू होते. हे लोक त्या मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढवत होते. या लोकांनी ऑपरेशन गंगावरही टीका केली. प्रत्येक योजनेला, प्रत्येक कामाला जातीवादाचा रंग देण्याचा प्रयत्न हा भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंतेचा विषय आहे. असे खंत मोदींनी व्यक्त केली.

कुटुंंबवादाने भारताचे नुकसान

या निवडणुकांमध्ये मी सातत्याने विकासावर बोललो, गरिबांना घर, गरिबांना रेशन, लसी, आधुनिक पायाभूत सुविधा, प्रत्येक विषयावर भाजपचे व्हिजन जनतेसमोर ठेवले आहे. ज्या गोष्टीबद्दल मी सर्वात जास्त चिंता व्यक्त केली ती म्हणजे कुटुंबवाद. मी लोकांना सांगितले की, मी कुटुंबाच्या विरोधात नाही, मी कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात नाही. कुटुंबवादाने राज्याचे किती नुकसान केले आणि राज्य मागे नेले. हे ओळखूनच मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीची शक्ती मजबूत केली. असे मोदी म्हणाले.

युवाशक्तीमुळे हे घडत आहे
भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रवेश करत आहे. या निवडणुका आपला राष्ट्रीय संकल्प दर्शवतात. येथून आम्ही एकत्र वेगाने काम करणार आहोत. एकीकडे गाव, गरीब, लहान शेतकरी यांच्या कल्याणावर आमचा भर आहे. तर दुसरीकडे, देशाची संसाधने, युवाशक्ती यांना नवीन संधी देऊन आत्मनिर्भरतेला गती द्यायची आहे. आजपर्यंत भारतातील तरुण आपल्या प्रतिभेच्या जोरावर, बुद्धिमत्तेच्या बळावर आणि आपल्या क्षमतेचा वापर करून जगाला उपाय देत आहे. जगातील सर्वात मोठी आणि जलद लसीकरण मोहीम हे भारताच्या आजच्या क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. आज भारत डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये आत्मनिर्भर होत आहे. ते स्टार्टअपच्या क्षेत्रात आपली क्षमता वाढवत आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन यश मिळवत आहे. युवाशक्तीमुळे हे घडत आहे. अस मोदी म्हणाले.

आज असा नवा भारत निर्माण होत आहे, जिथे तुमची ओळख तुमच्याशी आहे. मला खात्री आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्राचे पालन करून आपण आपल्या राज्यांना नवीन उंचीवर नेऊ. जेव्हा देशातील प्रत्येक राज्याचा विकास होईल, तेव्हा देशाचाही विकास होईल. गुजरातमध्ये काम केले, गुजरातमध्ये आमचा मंत्र भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास हाच होता. मोठे संकल्प आणि हेतू घेऊन देशाला पुढे न्यायचे आहे. उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक मतदान करणाऱ्या मतदारांचे मी अभिनंदन करतो. दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवून मतदारांचे कौतुक करा. भारत माता की जय, भारत माता की जय… असे म्हणत मोदींनी मतदात्याचे आभार मानले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: