मोदी सरकार या गरजेच्या वस्तूंवरील GST वाढणार? सामान्य नागरिकांना मोठा धक्का !

 

कोरोना संसर्गाचे नकात कमी होत असताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यात नागरिकांना जोरदार धक्का देत मोदी सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे. मोदी सरकार गरजेच्या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर वाढवण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार जीएसटी परिषदेच्या पुढच्या बैठकीत सर्वात कमी असलेला कराचा टप्पा वाढवण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेली समिती जीएसटी परिषदेला अहवाल देऊ शकते. यात जीएसटीमधील कराचा सर्वात कमी असलेला टप्पा वाढवण्याची आणि तो तर्कसंगत करण्यासाठीची शिफारस यातून करण्यात येणार आहे.

जीएसटीचा 5 टक्क्यांचा टप्पा वाढवून तो 8 टक्के करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांच्या समूहाने जीएसटी परिषदेसमोर ठेवला आहे. साखर, तेल, मसाले, कॉफी, चहा, काजू, मिठाई, नमकीन, अगरबत्ती, लाईफबोट, जीवन रक्षक औषधं, आयुर्वेदिक औषधं या 5 टक्के कर असलेल्या वस्तू आहेत. प्रस्ताव मंजूर झाला तर या वस्तूंवरील जीएसटी वाढेल.

Team Global News Marathi: