राज्याच्या कर्जाच्या खाईत ढकलायचा मोदी सरकारचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या कर्जाच्या खाईत ढकलायचा मोदी सरकारचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सभागृहात मोदी सरकारवर आणि राज्यकतील विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढविला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून अदयाप न मिळालेल्या फंडाच्या बाबतीत वक्त्यव्य केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राकडून अदयाप २२ हजर कोटी मिळालेले नाहीत हे पैसे देणे दूरच उलट कर्ज काढा असे केंद्राकडून सांगितले जात आहे. राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचे हे पाप मोदी सरकार करत आहे.

पुढे मुख्यमंत्र्यांनी संकटात विरोधकांना एकत्र येणाबाबत सल्ला देताना म्हणले की, आम्ही सत्ताधारी पक्ष आणि तुम्ही विरोधी पक्ष असे न करता आपण मराठी मातेची लेकरं आहोत म्हणून महाराष्ट्रासाठी कधीतरी एकवटून केंद्राला आपण जाब विचारणार की नाही? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत विरोधकांना विचारला आहे.

करोना संकट हे तोंडी लावण्यासाठी आहे हे ठीक आहे. मात्र वस्तू आणि सेवा कराची मांडणी जर का चुकीची असेल तर यावर चर्चा कोण करणार? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. लॉकडाउनचा मार्ग पंतप्रधानांनी देशाला दाखवला. त्यानंतर सांगितले आत्मनिर्भर व्हा. सगळ्या नाड्या आवळायच्या आणि सांगायचे श्वास घ्या असे हे सांगण्यासारख आत्मनिर्भर व्हा सांगणे आहे अशीही घणाघाती टीका त्यांनी केली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: