टाइम मॅगझीन’च्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, बॅनर्जी आणि पुनावाला यांचा समावेश !

 

नवी दिल्ली | टाइम या जगप्रसिद्ध मॅगझिनने नुकतील जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांची यादी प्रसिद्ध केली असून या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि संपूर्ण जगभराला कोरोना विरोधात लढण्यासाठी लस पुरवणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनवाला यांचा समावेश आहे.

टाइमने २०२१ या वर्षातील जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली होती. टाइसने या १०० प्रभावशाली लोकांची यादी ६ श्रेणींमध्ये विभागली आहे. या यादीत अमेरिका अध्यक्ष ज्यो बायडेन, उपाध्यक्षा कमला हॅरीस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि मेघन आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर यांचा समावेश आहे.

तसेच एलोन मस्कचे नावही ‘इनोव्हेटर्स’मध्ये समावेश आहे. याशिवाय पुतिनविरोधी कार्यकर्ते अलेक्सी नॅव्हलनी आणि रशियात अटक झालेली गायिका ब्रिटनी स्पीयर्स यांचाही या प्रभावशाली व्यक्तींच्या या यादीत स्थान देण्यात आले आहे. या यादीत नेते, कलाकार, पायनियर, चिन्ह, टायटन्स आणि शोधक यांचाही समावेश आहे. तसेच जगातील विविध क्षेत्रातील अनेक प्रभावशाली लोकांचाही समावेश आहे. टाइम मॅगझिनची ही यादी सर्वात शक्तिशाली आणि विश्वासार्ह यादी मानली जाते.

Team Global News Marathi: