लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू मनसेचा प्रवीण गायकवाड यांना इशारा |

 

पुणे | महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती. मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र मागील २० वर्षांपासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहेत. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे,’ असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले होते.

त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.

आता राज ठाकरे यांच्यावर प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या टीकेचा मनसे समाचार घेतला आहे. नगरसेवक वसंत मोरे म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रविण गायकवाड, असं सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

Team Global News Marathi: