मनसे अन् भाजपची युती होणार काय? देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्टच उत्तर

 

काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून जाहीर सभांतून भाजपचे कौतुक करत महा विकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. त्याच्या केल्या जाणाऱ्या कौतुकावरून आता मनसे व भाजपची युती होणार असा चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच या मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झालेली नसून असा काही प्रस्तावच आलेला नाही, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत केल्या जात असल्याच्या मनसे व भाजपच्या युतीच्या चर्चेबाबत मोठे विधान केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजप व मनसेच्या या ज्या काही युतीच्या बातम्या आहेत त्या कपोकल्पिय आहेत. राज ठाकरे व आमच्यात याबाबत अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र, निश्चित आहे कि राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत.

त्यातील बहुतांश भूमिकांना मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पिकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो. या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो आणि तेही मांडत आहेत. पण अद्याप आमचा कोणताही युतीबाबत प्रस्ताव नाही. कुठलीही चर्चा झालेली नाही.

Team Global News Marathi: