मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर; म्हणाले की,

 

मुंबई | गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. विधानसभा निवडणुकांनंतर भाजप सोबत न राहता महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं यावरुन राज ठाकरे यांनी टिका केली. अशातच आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेवर केली आहे. मनसे ही भाजपची’सी’ टीम असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

काही पक्षांना मी टाइमपास पक्ष म्हणत होतो. आता तरी त्यांना थोडे काम मिळाले आहे. एमआयएम ही भाजपची ‘बी’ टीम, तर मनसे ही ‘सी’ टीम आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. जो पक्ष इतकी वर्ष भूमिका स्पष्ट करू शकला नाही, त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे, असा टोलाही त्यांनी यावेळी मनसेला लगावला होता.

मविआ सरकार स्थापनेवरुन राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होणार नाही हे कळल्यानंतर शिवसेनेने भाजपसमोर मुख्यमंत्रीपदावर अडीच वर्षाचा दावा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा चार भिंतीआड का झाली? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यातील विधानसभेची मागील निवडणूक आठवा, सोबत कोण होतं आणि विरोधात आहे.

पळून गेले एकाबरोबर आणि लग्न कुणाबरोबर कळेनाच. निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार कसा झाला की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची ठरली होती. आधी जाहीर सभेत का नाही बोलले. अमित शाह यांच्याशी बंद दाराआड का बोलणं केलं? दुसरीकडे अशी चर्चा झाली नसल्याचे अमित शहा यांनी सांगितलं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Team Global News Marathi: