आमदार राजू पारवेंनी कोरोनात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या परिवारासोबत साजरी केली दिवाळी

 

नागपूर | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले होते तसेच अनेकांचा करता व्यक्ती गेल्यामुळे अनेकजण पोरकी झाली होती. अशातच सामाजिक भान बाळगून कुही तालुक्यातील मेंढा गावातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोविंदा निकेश्वर कुटुंबीयांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी निकेश्वर यांच्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली.

गोविंदा यांच्या कुटुंबात त्यांची ७० वर्षीय आई सायंत्राबाई राहते. पत्नी साधना यांना वयाच्या ३३ व्या वर्षी अकाली वैधव्य आलं. मुलगा आदित्य आणि मुलगी हे पोरके झाले. शिवाय कल्पना या त्यांच्या मतिमंद बहीण आहेत. या सर्वांचा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे यांनी कोविड मध्ये मृत्यू झालेल्या परिवाराचे पालकत्व स्वीकारले आहे.

घरातील कर्ती पुरुष तसेच मुलगा गेल्याने सायंत्राबाई दुःखी आहेत. मुलाऐवजी मला का घेऊन गेला नाही देव, असं विचारत होत्या. गेल्या वर्षीची दिवाळी सायंत्राबाईना आठवत होती. अचानक आमदार पारवे घरी आल्यानं त्यांना एक धीर मिळाला होता. पारवे यांनी एक मुलगा गेला असला तरी दुसरा मुलगा जिवंत आहे, असा धीर दिला.

तसेच आमदार पारवे यांनी सर्वांसाठी नवीन कपडे आणले. फटाकेही घेऊन आले होते. शिवाय आमदारांनी निकेश्वर कुटुंबीयांकडे जेवण घेतले. तसेच आर्थिक मदतही केली. त्यामुळं निकेश्वर कुटुंबीयांना यंदा दिवाळीचा आनंद लुटता आला. यावेळी सुनील किंदरले, राजू कुकळे, राजू कुथे व गावकरी उपस्थित होते.

Team Global News Marathi: